असत्याचा शब्द नको वा
2799.
असत्याचा शब्द नको वाचे माझे । आणिक हो का वोझे भलतैसें ॥१॥
परि संतरज वंदीन मी माथा । असत्य सर्वथा नोहे वाणी ॥२॥
अणुमात्र रज डोळा न साहे । कैसा खुपताहे जन दृष्टी ॥३॥
एका जनार्दनी असत्याची वाणी । तोचि पापखाणी दुष्टबुद्धि ॥४॥
