वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

पडिला प्रसंग का मी ऐ

🙏 3. संत तुकाराम · ABH-076961 · अभंग क्र. २७७५

2775.
पडिला प्रसंग का मी ऐसा नेणे । संकल्प ते मने जिरवले ॥१॥
चेष्टाविले तरी सांगावे कारणे । भक्ती ते जिवन करावया ॥धृपद॥
लावूनिया दृष्टि घेतली सामोरी । बैसले जिव्हारी डसोन ते ॥२॥
तुका म्हणे जीवा लाविला तो चाळा । करावे गोपाळा शीघ्र दान ॥३॥

अर्थ :
देवा मी निराश होण्याचा प्रसंग का आला हे मला काही कळत नाही काय, मला सर्व कळते आणि मी मनात ठरवलेले संकल्प तुला मागणार होतो ते मी माझ्या मनातच जिरुन टाकले आहेत. देवा मी आजपर्यंत जे जे काही कर्म केले ते भक्ती म्हणून आणि भक्ती हेच माझे जगण्याचे साधन व्हावे यामुळेच ते केले आहे. मी हरीच्यासमोर माझी दृष्टी लावून बसलो आहे आणि हरीचे तेच स्वरुप माझ्या जीवाशी जडून बसलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा गोपाळा मी माझ्या जीवाला तुमचाच चाळा लावला आहे त्यामुळे तुमच्या कृपेचे दान मला शीघ्र दयावे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग