वाया जाय ऐसा । आता उ
2791.
वाया जाय ऐसा । आता उगवावा फासा ॥१॥
माझे परिसावे गाऱ्हाणे । सुखदुःखाची वचने ॥धृपद॥
हाचि आम्हा ठाव । पायी निरोपाया भाव ॥२॥
तुका म्हणे जार । तुझा तुज देवा भार ॥३॥
अर्थ :
देवा ज्या भवसागराच्या पाशामध्ये मी वाया जाणार आहे तो पाशच तोडून टाक. देवा मी जी तुम्हाला सुखदु:खरुपी गाऱ्हाणे सांगणार आहे ते तुम्ही ऐकावे. देवा आमचा भक्तीभाव सांगण्याचे एकच ठिकाण आहे ते म्हणजे तुमचे पाय. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी तुझ्यापासूनच उत्पन्न झालो आहे त्यामुळे माझा सर्व योगक्षेमाचा भार तुझ्यावरच असणे हे साहाजिकच आहे.
