बोलिलिया गुणी नाही प
2807.
बोलिलिया गुणी नाही पाविजेत । देवा नाही होत हित तेथे ॥१॥
कवतुक तुझे न कळे यापरि । घेसील ते शिरी काय नव्हे ॥धृपद॥
नाही मिळे येत संताचिया मता । पुराणी पाहता अघटित ॥२॥
तुका म्हणे पायी निरोपिला भाव । न्याल तैसा जाव सिद्धी देवा ॥३॥
अर्थ :
देवा मी तुम्हाला माझे अवगुण सांगितलेलेच आहे त्या अवगुणामुळे माझे हित कसे होणार ? देवा अरे तुझे कौतुक कोणालाही कळणार नाही कळतही नाही आमचे हित करणे हे जर तू तुझ्या माथ्यावर घेतले तर तू काय करु शकत नाहीस ? देवा आपले पूर्वपुण्य जर चांगले असेल तर आम्हाला तुझी प्राप्ती होईल, या संतांच्या मताला मी सहमत नाही कारण पुराण उघडून पाहिले तर सर्व अघटितच प्रकार लक्षात येतात तू यापूर्वी अशा काही भक्तांचा उध्दार केला आहे म्हणजे वाल्मिक अजामेळ गणिका असे काही भक्त तुझे झालेत की त्यांचे पूर्वपुण्य चांगले नव्हते तरी देखील त्यांना तुझी प्राप्ती झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आता मी माझा भक्तीभाव जसा आहे तसा तुमच्या पायाजवळ निरुपण केला आहे आता माझा भक्तीभाव जसा सिध्दीला जाईल तसा जावो.
