वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

पराधीन माझे करूनिया

🙏 3. संत तुकाराम · ABH-077028 · अभंग क्र. २८०२

2802.
पराधीन माझे करूनिया जीणे । सांडी काय गुणे केली देवा ॥१॥
उदार हे कीर्ति असे जगामाजी । का ते ऐसे आजि पालटिले ॥धृपद॥
आळवितो परी न पुरेचि रीग । उचित तो त्याग नाही तुम्हा ॥२॥
तुका म्हणे का बा मुळींच व्यालासी । ऐसे का नेणसी पांडुरंगा ॥३॥

अर्थ :
देवा माझे जीने हे संचित कर्माचा आधीन झाले आहे म्हणजे मी पराधीन झालो आहे असे तुम्ही का बरे केले आहेत माझी अशी हेळसांड तुम्ही का केली? देवा जगामध्ये तुमची किर्ती म्हणजे तुम्ही उदार आहात अशी आहे मग माझ्या बाबतीत तुम्ही असा तुमचा रंग का पालटला आहे? देवा मी तुम्हाला खूप आळवित आहे परंतु माझे आळवणे तुमच्या पर्यंत पोहोचत नाही माझा असा त्याग करणे हे तुमच्यासाठी उचित नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा मुळात तुम्ही मला जन्मच का दिला आणि मला जन्म दिला नसता तर माझा कोणत्याही प्रकारचा भार तुमच्यावर आलाच नसता हे तुम्हाला पूर्वीच समजले नाही काय?

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग