जेथे जातो तेथे पडतो
2784.
जेथे जातो तेथे पडतो मतोळा । न देखिजे डोळा लाभ काही ॥१॥
कपाळीची रेखा असती उत्तम । तरि का हा श्रम पावतो मी ॥धृपद॥
नव्हेचि तुम्हास माझा अंगीकार । थीता संवसार अंतरला ॥२॥
भोग तव झाला खरा भोगावा तो । भांडवल नेतो आयुष्य काळ ॥३॥
कोठे तुझी कीर्ती आइकिली देवा । मुकतो का जीवा तुका म्हणे ॥४॥
अर्थ :
मी जेथे जातो तेथे मला केवळ नुसकानच दिसत आहे माझ्या डोळ्याने काही लाभ दिसतच नाही. माझ्या कपाळाची भाग्य रेषा जर चांगली असती तर मला एवढे कष्ट भोगावे लागले असते काय. देवा तुम्ही माझा अंगिकार करत नाही आणि माझ जो संसार होता तोही आता माझ्यापासून अंतरला आहे. जेवढा सुख आणि दुःख रुपी भोग होता तेवढा भोगला खरा पण आता मात्र काळ माझ्या आयुष्याचे भांडवल नेता आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी कुठ तुझ्या नादी लागलो काय माहित तुझ्या जर नादी लागलो नसतो तर मी माझ्या जीवाला मुकलो असतो काय?
