नाही नामासी साधन । न
2801.
नाही नामासी साधन । निरहार न उगे उपोषण । नको दंडन मुंडन । सुखे वाचे आठवी ॥१॥
काया कष्ट नको कांही । देश विदेशासी न जाई निवांतची ठायी । बैसोनिया जपे ॥२॥
नको वित्त धन नाश । होउनी देहींच उदास । एका जनार्दनी नाश । नको करू शरीराचा ॥३॥
