जेथे कष्टे न लभे ज्ञ
2791.
जेथे कष्टे न लभे ज्ञान । आधी पाहिजे समाधान । योगयाग तपाचे नाही कारण । शांति क्षमा दया जाण मुख्य धरी ॥१॥
आणिक नको रे साधन । वाया शीण ब्रह्माज्ञान । आम्ही मुखी गाऊ रामकृष्ण । हेंचि समाधान आमुचे ॥२॥
आलिया जन्माचें सार्थक । जन्मजरा निवारुं दुःख । कायावाचामनें संतसेवा देख । दुजा हेतु नाही मनी ॥३॥
जन तोचि जनार्दन । साक्षी तया लोटांगण । एका जनार्दना शरण । कायावाचामनेंसी ॥४॥
