वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

नाही मज कृपा केली पा

🙏 3. संत तुकाराम · ABH-077000 · अभंग क्र. २८०५

2805.
नाही मज कृपा केली पांडुरंगे । संताचिया संगे पोट भरी ॥१॥
चतुराचे सभे पंडित कुशल । मी काय दुर्बळ विष्णुदास ॥२॥
तुका म्हणे नेणे करू समाधान । धरिले चरण विठोबाचे ॥३॥

अर्थ :
पाडूरंगाने अजूनही माझ्यावर कृपा केलेली नाही संतांच्या संगतीत राहूनच मी पोट भरीत आहे. चतुर लोकांच्या सभेमध्ये कुशल पंडीत लोकांना चांगले स्थान असते मी तर दुर्बळ विष्णूदास आहे माझी तेथे काय किंमत आहे ? तुकाराम महाराज म्हणतात, त्यामुळे हे पंडीतजनहो मी काही बोलून तुमचे समाधान करु शकणार नाही कारण मला दुसरे काही आठवत नाही मी केवळ विठोबाचेच चरण धरलेले आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग