जे जे केले ते ते साह
2804.
जे जे केले ते ते साहे । कैसे पाहे भाविक ॥१॥
ओवाळूनि माझी काया । सांडिली यावरूनि ॥धृपद॥
काय होय नव्हे करू । नेणे धरू सत्ता ते ॥२॥
तुका म्हणे कटी कर । उभे धीर धरूनि ॥३॥
अर्थ :
आम्ही भक्तांनी जे जे काही केले ते ते सर्व देवाने सहन केले भोळया भक्तांचा कसा भाविक आहे हा देव पाहा. त्यामुळेच तर मी माझे शरीर या देवावरुन ओवाळून टाकले आहे. या देवाने मनात आणले तर तो काय करु शकत नाही सर्व काही करु शकतो परंतू भक्तांच्या पुढे तो आपली सत्ता धरतच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, असा हा देव आपले दोन्हीही कर कटेवर ठेवून भक्तांचे कार्य करण्यासाठी विटेवर धीर धरुन उभा आहे.
