नव्हे मी शाहाणा । तर
2771.
नव्हे मी शाहाणा । तरी म्हणा नारायणा ॥१॥
तुम्हा बोलवाया काही । येच भरलोंसे वाही ॥धृपद॥
आणावेति रूपा । कोपलेती तरी कोपा ॥२॥
कळोनि आवडी । तुका म्हणे जाते घडी ॥३॥
अर्थ :
नारायणा मी खूप शहाणा नाही तरीपण मला तुम्ही तुमचा म्हणा. अहो देवा तुम्ही मला बोलावे मला हाक मारावी माझ्याशी बोलावे यासाठीच मी प्रयत्न करीत आहे. देवा तुम्हाला एकदा नामरुपाला आणावे असे मला वाटते त्यानंतर मग तुम्ही माझ्यावर रागावलात तरी निर्धास्तपणे रागावा. तुकाराम महाराज म्हणतात, हे नारायणा तुम्हाला माझी आवड समजलेली आहे तरीही ती माझी आवड पूर्ण होत नाही, घटका मागून घटका चाललेली आहे.
