विषया जो लंपट । तया
2761.
विषया जो लंपट । तया नावडे ही वाट । पंढरी सुभट । नावडेचि पापिष्ठा ॥१॥
अमृत फळे पूर्ण आली । का गा जैसी परी जालीं । तैसीच हे चाली । पापिष्ठाची जाणावी ॥२॥
धनलुब्धका नावडे धर्म । मद्यपिया नावडे कर्म । जारासी संतसमागम । नाठवेचि सर्वथा ॥३॥
स्त्रीलुब्ध परद्वारी । काय तया गीता निर्धारी । एका जनार्दनी हरी । नको संग तयाचा ॥४॥
