पंडितांच्या वचना द्य
2786.
पंडितांच्या वचना द्यावे अनुमोदन । परि होत नोहे जाण तेणे कांही ॥१॥
शास्त्रीयाचे वचना द्यावे अनुमोदन । परि हित नोहे जाण तेणे कांही ॥२॥
वेदांताच्या वचना द्यावे अनुमोदन । परि हित नोहे जाण तेणे काही ॥३॥
पुराणिकांचे वचनी द्यावे अनुमोदन । परि हित नोहे जाण तेणे काही ॥४॥
संताच्या वचना द्यावे अनुमोदन । एका जनार्दनी तेणे हित होय ॥५॥
