वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 107. कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८

तू नायकसी कवणाचें ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086977 · अभंग क्र. २७९०

2790.
तू नायकसी कवणाचें । बोलता नये बहु वाचे । तुझे तुज हिताचें । वर्म आम्ही सांगूं ॥१॥
होई सावध झडकरी । नको पडुं आणिके भरीं । वायांची धांवसी दिशाभरी । श्रमू निर्धारी तुजची ॥२॥
ब्रह्मज्ञानाची भरोवरी । वाउगी न करी निर्धारी । कर्म अकर्म आधी सारी । मग निर्धारी सुख पावे ॥३॥
जेणे तुष्टे जनार्दन । हेंचि करी पा साधन । शरण एका जनार्दन । वाउगा शीण न करी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग