वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

लावूनिया गोठी । चुकव

🙏 3. संत तुकाराम · ABH-077098 · अभंग क्र. २८०९

2809.
लावूनिया गोठी । चुकवू आदरिली दिठी । देऊनिया मिठी । पळे महिया माथुले ॥१॥
पुढे तेची करी आड । तिचा लोभ तिसी नाड । उरवी चरफड । हात गोउनी पळावे ॥धृ॥
आधी काकुलती । मोहो घालावापुढती । तोंडी पडे माती । फिरता मग कैचा तो ॥२॥
तुका म्हणे देवा । यासी रडवी याचा हेवा । भावे का हे सेवा । सुखे तुम्हा नार्पीती ॥३॥

अर्थ :
कृष्णाने एके दिवशी गोपीकांच्या सोबत बसून त्यांना थोडयाशा गप्पा गोष्टीमध्ये रंगवून त्यांची नजर चुकवण्यास सुरवात केली. नंतर त्याने गोपीकांच्या अंगावर गुपचूप झडप घालून त्यांच्या दह्यादुधाचे मटकेच घेऊन पळून गेला. त्याच गवळणीला पुढे दह्यादुधाचा लोभच तिला आडवा येऊ लागला व मोक्षाला तो मोह आडवा झाला. मग भगवंताने या श्रीकृष्णाने तिचे हात सारखे कामात गुंतवून ठेवले आणि तिच्या मागे चरफड करणेच बाकी ठेवून देव तेथून पळून गेले. आधी काकूळतीला यावे, मग संसाराचा मोह पुढे घालावे. मग त्यांच्या तोंडात माती पडते, एकदा की त्याच्यापासून (देव) ते मागे फिरले पुन्हा संसाराच्या मोहात पडले तर तो त्यांना कसा मिळणार आहे ? तुकाराम महाराज म्हणतात, देवा यांचा हेवाच यांना रडवित असतो. देवा तुम्हाला या गोपीका सुखाने दही दूध लोणी सेवा म्हणून का अर्पण करीत नाहीत.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग