सत्य आठविता देव । जा
2793.
सत्य आठविता देव । जातो भेंव पळोनि ॥१॥
न लगे काही करणे चिंता । धरी सत्ता सर्व तो ॥धृपद॥
भावे भाव राहे पायी । देव तै संनिध ॥२॥
तुका म्हणे कृष्णनामे । शीतळ प्रेमे सर्वांसी ॥३॥
अर्थ :
खरा भक्ती भाव मनात ठेवून देवाची आठवण केली तर कोणत्याही प्रकारचे भय असले तरी ते भय पळून जाते. मग आपल्याला कोणत्याही प्रकारची चिंता करावी लागत नाही कारण देवाकडे सर्व सत्ता असतात. खऱ्या भक्तीभावाने देवाच्या पायाच्या ठिकाणी श्रध्दा ठेवली तर देव आपल्या सान्निध्यात राहात असतो. तुकाराम महाराज म्हणतात, कृष्ण नामाचा उच्चार केला की कायावाचामन हे शीतळ होऊन त्याला समाधान प्राप्त होते.
