वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

तुम्ही तो सदैव । अधी

🙏 3. संत तुकाराम · ABH-077023 · अभंग क्र. २७६५

2765.
तुम्ही तो सदैव । अधीरपणे माझी हाव ॥१॥
जळो आशेचे ते जिणे । टोंकतसावे दीनपणे ॥धृपद॥
येथूनि सोडवा । आता अनुभवे देवा ॥२॥
तुका म्हणे झाले । एक मग हे निमाले ॥३॥

अर्थ :
देवा तुम्ही तर सदैव उदार आहात परंतू मी अधीर आहे माझी हाव अधिकच वाढत आहे. अशा आशाबध्द जगण्याला आग लागो कारण इच्छित वस्तू मिळण्यासाठी त्याला दीनपणाने वाट पाहावी लागते. देवा तुम्हाला आशाळभूत जगणे कसे असते याचा अनुभव आहे ना, तुम्ही बळीराजाच्या घरी किती आशाळभूत होऊन गेला होतात मग आशाळभूत मनुष्य किती दीन असतो हे तुम्हाला माहितच आहे त्यामुळे स्वत:च्या अनुभवावरुन तरी मला यातून सोडवा. तुकाराम महाराज म्हणतात, देवा एकदा की माझा अधीरपणा गेला की मग सर्व कामच संपले.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग