हा तो नव्हता दीन । ट
2808.
हा तो नव्हता दीन । टाळायाचा ऐसा क्षण ॥१॥
का जी नेणो राखा हात । कैसे देखावे रडत ॥धृपद॥
दावूनिया आस । दूर पळविता काशास ॥२॥
तुका म्हणे धाव । येता न पुरेचि हाव ॥३॥
अर्थ :
देवा दीनजणांची टाळाटाळी करण्याचा हा क्षण नव्हता. देवा तुम्ही असा हात राखून का वागता हे मला काही कळत नाही आणि आम्ही तुमच्यापुढे रडत आहोत हे तुम्हाला कसे देखवत आहे? देवा तुम्ही मला फक्त प्रथम आशा दाखवता आणि नंतर मग दूर कशासाठी माझ्यापासून पळता ? तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुमच्याकडे सारखे सारखे धाव घ्यावा ही माझी हाव काही थांबत नाही.
