करूनि कडविड । जमा घड
2769.
करूनि कडविड । जमा घडिली लगड ॥१॥
होते तेचि झाले । नाम ठायीचे पडीले ॥धृपद॥
उतरले डाई । उत्तम सुलाख ते ताई ॥२॥
हिंडविता देशोदेश । तुका म्हणे नाही नाश ॥३॥
अर्थ :
सोन्याचे किडूकमिडूक जमा करुन त्याची एकच लगड तयार केली तर ते लगड तयार करताना पूर्वी अलंकार होते नंतर ते अलंकार आटविले, म्हणजे ते लगड पूर्वी अलंकार होते परंतू आटवल्यानंतर पुन्हा मूळ स्वरुपात म्हणजे सोन्यातच त्याचे रुपातर झाले व पुन्हा त्याला सोने हेच नाम प्राप्त झाले. मग ते सोने डाईत घालून चांगले अग्नीत सुलाखले तर मग ते उत्तम कसाला उतरते. तुकाराम महाराज म्हणतात, अश्या प्रकारे सोने कोणत्याही देशोदेशी हिंडवले तरी त्याचे जे मूल्य आहे त्याचा कधीही नाश होत नाही.
