वाढवावा पुढे आणीक प्
2777.
वाढवावा पुढे आणीक प्रकार । एकचि ते फार रुचि नेदी ॥१॥
निच नवे लेणे देह हा पवाडा । पालट रोकडा वरावरी ॥धृपद॥
दिसे शोभिवंत सेवेने सेवक । स्वामीची ते लोकत्रयी कीर्ति ॥२॥
तुका म्हणे आजी पाववा संतोष । करुनि कीर्तिघोष नाचईन ॥३॥
अर्थ :
देवा भक्तीमार्गामध्ये अनेक प्रकार पुढे वाढतच राहावे कारण एकच प्रकार सारखा सारखा आवडतच नसतो अहो देवा देहाला देखील नवीन अलंकार कपडे घालून फिरण्याची हौस असतेच. स्वामीची सेवा केल्याने सेवक देखील शोभून दिसतो आणि सेवा केल्याने स्वामीची देखील त्रैलोक्यात किर्ती होते. तुकाराम महाराज म्हणतात देवा भक्तीमार्गामध्ये अनेक साधने मला देऊन आज संतुष्ट करावे मग तुमच्या किर्तीचा घोष करुन मी तुमच्यापुढे आनंदाने नाचेन.
