वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

पाहिजे ते आता प्रमाण

🙏 3. संत तुकाराम · ABH-077237 · अभंग क्र. २७७४

2774.
पाहिजे ते आता प्रमाण प्रत्यक्ष । आलियाने साक्ष खरे खोटे ॥१॥
काय त्या दिवस उचिताचा आला । मागील जो केला श्रम होता ॥धृपद॥
ठेवीयली खूण करोनी संकेत । तया पाशी चित्त लागलेसे ॥२॥
जाणसी गे मते लेकरांचा लाड । नये पडो आड निष्ठुरता ॥३॥
तुका म्हणे आम्ही करावे वचन । तुम्हासी जतन करणे ते ॥४॥

अर्थ :
देवा आता मला तुझा प्रत्यक्ष अनुभव आला पाहिजे जर मला अनुभव आला तरच मला खरे काय खोटे काय याचा पुरावा निश्चिंत होईल. देवा मी पूर्वी जी तुमची सेवा केली त्याचे फळ मिळण्याचा उचित दिवस आज आला आहे काय ? देवा तुम्ही देव आहात आणि मी भक्त आहे आणि मी भक्त म्हणून तुमची सेवा करावी तुम्ही मला तुमचे सगुणरुप दाखवावे असा जो आपण यापूर्वी संकेत करुन ठेवला आहे त्यापाशीच माझे आता चित्त लागले आहे. हे माते विठाबाई तू तुझ्या लेकरांची म्हणजे आमचे सर्व लाड जाणते आहेस मग त्या लाडामध्ये आता निष्ठूरता आड येऊ देऊ नकोस. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आम्ही लेकरांनी तुमच्यापुढे लाडाने हट्ट करावेत आणि तुम्ही त्याचे जतन करुन ते पूर्ण करावेत हे तुमचे कर्तव्य आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग