वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

आम्ही पाहा कैसी एकतत

🙏 3. संत तुकाराम · ABH-077276 · अभंग क्र. २७६२

2762.
आम्ही पाहा कैसी एकतत्त्वी झालो । राखणे लागलो वासनेसी ॥१॥
तुम्हाविण काही नावडावे या जीवा । केला तोचि देवा दृढ पण ॥धृपद॥
वर्म नेणो परि वृत्ती भंगो नेदु । वंदिलेंचि वंदू आवडीने ॥२॥
तुका म्हणे कले नामाचे जीवन । वारताही भिन्न नेणो आता ॥३॥

अर्थ :
देवा आम्ही तुमची भक्ती करावी अशी आमची वासना आहे व त्या वासनेचे आम्ही रक्षण करत आहोत पाहा आम्ही कसे एकत्रित झालो आहोत. देवा तुमचेवाचून या जीवाला काहीही आवडू नये असाच आम्ही दृढपण केला आहे. देवा आम्हाला तुझे वर्म कळत नाही परंतू आमची तुझ्याविषयी एकनिष्ठ वृत्ती जी आहे ती आम्ही पागू देणार नाही आणि जे वंदय आहेत त्यांना आम्ही आवडीने वंदन करु. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझ्या नामालाच आम्ही आमचे जीवन केले आहे त्यावाचून इतर कोणतीही वार्ता आम्ही ऐकणार नाहीत.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग