वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

आर्तभूता द्यावे दान

🙏 3. संत तुकाराम · ABH-077173 · अभंग क्र. २८१०

2810.
आर्तभूता द्यावे दान । खरे पुण्य त्या नावे ॥१॥
होणार ते सुखे घडो । लाभ जोडो महाबुद्धी ॥धृपद॥
सत्य संकल्पचे साठी । उजळा पोटी रविबिंब ॥२॥
तुका म्हणे मनी वाव । शुद्ध भाव राखावा ॥३॥

अर्थ :
ज्याला ज्या गोष्टीची खरोखर गरज आहे ती गोष्ट त्याला दान म्हणून दयावी हेच खरे दान आणि हेच खरे पुण्य आहे. जर आपण दान केले तर त्यानंतर आपले काय होणार असेल ते सुखाने होऊ दयावे त्याविषयी चिंता करु नये परंतू मोठया बुध्दीने होणाऱ्या पुण्याचा लाभ जोडून घ्यावा. सत्य संकल्पासाठी आपल्या पोटामध्ये विवेकरुपी सूर्‍याचा उजेड होऊ दयावा. तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या मनामध्ये नेहमी चांगल्या गोष्टीला वाव असू दयावे आणि मनामध्ये गुरु वेद आणि हरी याविषयी शुध्द भक्तीभाव राखावा.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग