वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 107. कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८

पवित्र अंतर शुद्ध कर

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087012 · अभंग क्र. २७८७

2787.
पवित्र अंतर शुद्ध कर मन । तेणे घडें जाण सर्व कर्म ॥१॥
वेदयुक्त मंत्र जपतां घडें पाप । मी मी म्हणोनी संकल्प उठतसे ॥२॥
यज्ञादिक कर्मे घडता सांग । मी मी संसर्ग घडता वाया ॥३॥
दानधर्मविधी धरिता शुद्ध मार्ग । मी मी म्हणता याग वाया जाय ॥४॥
एका जनार्दनी मीपणा टाकून । करी कृष्णार्पण सर्वफळ ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग