समाधि योग - अभंग २८०
2809.
समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६
गुरु जनार्दन सांगे राममंत्र । पूजावे पवित्र द्विजवर ॥१॥
जोडिली संपदा ब्राह्मणासी द्यावी । अखंड करावी चरणसेवा ॥२॥
ब्राह्मणाचें तीर्थ जे नर सेविती । हरिहर येती वंदावया ॥३॥
ब्राह्मणाचें तीथ ज्या नर मस्तकी । सायुज्यता मुक्ति पाया लागे ॥४॥
एका जनार्दनी मुक्ति हे तो वाव । भजा हे भूदेव कोटी जन्मी ॥५॥
