देखिले ते धरिन मने ।
2790.
देखिले ते धरिन मने । समाधाने राहेन ॥१॥
भाव माझी सांटवण । जगजीवन कळावया ॥धृपद॥
बोळवीन एकसरे । उत्तरे या करुणेच्या ॥२॥
तुका म्हणे नयो रूपा । काय बापा करीसील ॥३॥
अर्थ :
देवा तुझे रुप मला एकदा की दिसले मग ते मी पाहीन माझ्या मनात ते कायमस्वरुपी धारण करीन आणि समाधानी राहीन. देवा तू जगज्जीवन आहेस तुझे ज्ञान होण्यासाठी माझ्या ह्दयामध्ये मी शुध्द भक्तीभावाने तुला साठवून धरीन. एकदा की देव सगुण साकार झाला की चांगल्या करुण गोड वचनाने संभाषण करीन व त्याला आळवीन. तुकाराम महाराज म्हणतात, हे माझ्या बापा पाडूरंगा तू सगुण साकार रुपात न येऊन नुसताच निर्गुण स्वरुपात काय करशीन ?
