लांब लांब तुम्ही सां
2780.
लांब लांब तुम्ही सांगाल गोष्टी । तत्त्वेंसी भेटी करी उठाउठी ॥१॥
मीपण जोंवरी गेले नाही । तोंवरी तुम्ही केले काई ॥२॥
मीपण देही प्रपंच दृष्टी । कोरड्या काय सांगाल गोष्टी ॥३॥
एका जनार्दनी बांधावें सत्य । बोलामाजीं तेणेंक दाखविले तत्त्व ॥४॥
