न करी उदास । माझी पु
1469.
न करी उदास । माझी पुरवावी आस ॥१॥
ऐका ऐका नारायणा । माझी परिसा विज्ञापना ॥धृपद॥
मायबाप बंधुजन । तू चि सोयरा सज्जन ॥२॥
तुका म्हणे तुजविरहित । माझे कोण करील हित ॥३॥
अर्थ :
हे देवा हे पांडुरंगा आता तरी कृपा करून तुम्ही माझ्या मनाची आस पुरवावी व मला उदास करू नये, माझी इच्छा अव्हेरू नये. हे नारायणा तुम्ही कृपा करून माझी घोषणा ऐका, माझे काय म्हणणे आहे ते ऐकून घ्या. कारण तूच काय तो मला आता सर्व काही आहेस, तूच माझा मायबाप, तूच माझे बंधुजन, तूच काय तो मला सखा आणि सोयरा आहेस, तुझ्या शिवाय मला इतर कोणीही नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे विठ्ठला कारण माझे जे खरे हित आहे, माझा जो काही उद्धार करायचा आहे तो तुझ्याशिवाय इतर कोणीही करू शकत नाही.
