वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

मज तयांची आवड । पुरव

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086065 · अभंग क्र. १४८२

1482.
मज तयांची आवड । पुरवणे लागे त्याचे कोड । गर्भवास सांकड । तयालागी उद्धवा ॥१॥
घेऊनी अवतार । करी दृष्टांचा संहार माझा हा बडिवार । तयाचेनि उद्धवा ॥२॥
माझे जप तप अनुष्ठान । देव पूजा मंत्र पठण । नाना नेमादि साधन । संत माझे उद्धवा ॥३॥
मज आणिले नामरुपा । त्याची मजवर कृपा । दाविला हो सोपा । मार्ग मज उद्धवा ॥४॥
माझा योगयाग सर्व । संत माझे वैभव । वैकुंठादि राणीव । तयाचेनि मज उद्धवा ॥५॥
ऐसे वरिष्ठ पावन । पुनीत केले मजलागून । एका जनार्दनी शरण । तयांसीच उद्धवा ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग