जीवन उपाय । वैदेवाणी
1470.
जीवन उपाय । वैदेवाणी तुझे पाय ॥१॥
ते मी नाठवी घडिघडी । म्हणोनिया चरफडी ॥धृपद॥
तुटे भवरोग । जेथे सर्व सुख भोग ॥२॥
तुका म्हणे विटे । धरियेले जे गोमटे ॥३॥
अर्थ :
गांजलेल्या आणि नाडलेल्या लोकांना तसेच पीडित आणि रोग्यांनादेखील जीवन सुलभ करण्याचा उपाय म्हणजेच तुझे पाय, तुझ्या पायाचे चिंतन आणि त्यांची सेवा. माझ्याकडून देखील तुझ्या पायाचे सतत चिंतन न झाल्याने माझ्याजीवाची देखील चरफड होते आणि जगणे नकोसे होते. तुकाराम महाराज म्हणतात भवरोगातून तारून जाण्याचा उत्तम मार्ग तसेच खऱ्या सुखाला पदरात पाडून घेण्याचा सर्वोत्तम उपाय आणि विटेने देखील आजवर जे धरून ठेवले आहेत ते गोमटे असे तुझे पाय हे सर्व सुखांची खाण आहेत.
