हरिभजनीं घेता गोडी ।
1469.
हरिभजनीं घेता गोडी । निवारे जन्ममरण कोडी ॥१॥
भावे करिता हरीचें भजन । देवा होय समाधान ॥२॥
हरिभजनाची आवडी । काळ केला देशोधडी ॥३॥
एका जनार्दनी भजन । भजनी पावे समाधान ॥४॥
1469.
हरिभजनीं घेता गोडी । निवारे जन्ममरण कोडी ॥१॥
भावे करिता हरीचें भजन । देवा होय समाधान ॥२॥
हरिभजनाची आवडी । काळ केला देशोधडी ॥३॥
एका जनार्दनी भजन । भजनी पावे समाधान ॥४॥