संसारसंकटे रिघालो पा
1477.
संसारसंकटे रिघालो पाठिसी | आता झणी देसी त्यांचे हाती ॥१॥
बीदे बडिवार ऐकोनिया फार | रिघो आम्ही द्वार विठोबाचे ॥२॥
आणिकहि वार्ता सांगो काय आता | पंढरिच्या नाथा परिसावे ॥३॥
अमृत पाजणे प्रीतीने भक्तासी | सत्य हृषिकेशी नामा म्हणे ॥४॥
