वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

उद्धवा स्वमुखे सांगे

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085962 · अभंग क्र. १४७८

1478.
उद्धवा स्वमुखे सांगे श्रीकृष्ण । संतसेवा जाण सर्वश्रेष्ठ ॥१॥
हाची योग जाण उद्धवा स्वीकारी । आणिक न करी भरोवरी साधन उद्धवा ॥२॥
योगयाग तप वत कसवटी । न करी आन गोष्टीरे उद्धवा ॥३॥
कीर्तन भजन सर्वभावे करी । जाई संतद्वारी शरणागत रे उद्धवा ॥४॥
मनींचे निजगुज सांगितले तुज । एका जनार्दनी निज साधे रे उद्धवा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग