जगत्रजीवना अगा नाराय
1480.
जगत्रजीवना अगा नारायणा | का नये करुणा दासाची हे ॥१॥
अच्युता केशवा ये गा दीनानाथा | सर्वज्ञ समर्था कृपामूर्ति ॥२॥
चिद्घना चिरूपा विरंचीच्या बापा | करावी जी कृपा सर्वांभूती ॥३॥
तुझे म्हणविले उपेक्षिसी जरी नामा म्हणे हरी ब्रीद काय ॥४॥
