सेवकासी आज्ञा निरोपा
1487.
सेवकासी आज्ञा निरोपासी काम । स्वामीचे ते धर्म स्वामी जाणे ॥१॥
मनाचिये मुळी रहावे बैसोन । आकर्षावे गुण पायापाशी ॥धृपद॥
भेटीचे तांतडी करीतसे लाहो । ओंवाळावा देहो ऐसे वाटे ॥४॥
तुका म्हणे माझे करावे कारण । आपुले जतन ब्रीद करा ॥३॥
अर्थ :
मालकाने सेवकाला जो निरोप दिला तो मालकाने जसा सांगितला तसा सांगणे हे सेवकाचे कर्तव्य आहे मग तो निरोप बरोबर आहे की चुकीचा ते मालक ठरवून घेईल. मनाचे मूळ हरीचे रूप आहे त्या ठिकाणी ते स्थिर करावे आणि सर्व गुण हरीच्या पायाजवळ आहे असे समजावे. देवा तुमच्या भेटीविषयी मी तातडी करत आहे आणि तुमच्या वरून हा देह ओवाळून टाकावा असेच मला वाटत आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमचे काम म्हणजे मला भेट देण्याचे आहे त्यामुळे मला भेट देऊन तुम्ही तुमचे ब्रीद सांभाळावे.
