वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

भांबावला देव संतामाग

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085955 · अभंग क्र. १४८४

1484.
भांबावला देव संतामागें धावें । उघडाचि प्रभवे पंढरीये ॥१॥
युगें अठ्ठावीस पुंडलिकासाठीं । उभा जगजेठी विटेवर ॥२॥
यावे तया द्यावे क्षेमालिंगन । पुसावा तो शिणभाग त्यास ॥३॥
कुर्वाळुनी करे धरी हनुवटी । म्हणे मजसी भेटी तुमची झाली ॥४॥
लाघव तयासी दावी आपुले बळे । पुरवावे लळे सत्य त्याचे ॥५॥
जैशी त्याची भावना आपण पुरवी । एका जनार्दनी गोंवी आपल्या कडे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग