मीही संतचरण वंदीतसे
1483.
मीही संतचरण वंदीतसे माथा । वेदादि साम्यता थोडी तेथे ॥१॥
पुराणासी धाड पडले सांकडे । शास्त्रांचे ते कोडे उगवेल ॥२॥
अहं ब्रह्मा ऐशा श्रुति वेवादती । नेति त्या म्हणती तटस्थ ठेल्या ॥३॥
उपासनामार्ग परंपरा जाला । तो बोध तुला सांगितला ॥४॥
एका जनार्दनी संतांचा सांगत । न चुको देऊं हित आपुलें तू ॥५॥
