मी तो संतांचे पोसणे
1478.
मी तो संतांचे पोसणे ।
देती समयी तेचि खाणे ॥१॥
अवघी चुकली जाचणी ।
उण्यापुयाची सोसणी ॥२॥
करु सांगितले काज ।
चिंता दवडूनिया लाज ॥३॥
निळा म्हणे फिटली खंती ।
जिणे मरणे त्यांचे हाती ॥४॥
1478.
मी तो संतांचे पोसणे ।
देती समयी तेचि खाणे ॥१॥
अवघी चुकली जाचणी ।
उण्यापुयाची सोसणी ॥२॥
करु सांगितले काज ।
चिंता दवडूनिया लाज ॥३॥
निळा म्हणे फिटली खंती ।
जिणे मरणे त्यांचे हाती ॥४॥