वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ३. सार्थ अभंग १००१ ते १५००

नेणे जप तप अनुष्ठान

🙏 3. संत तुकाराम · ABH-078855 · अभंग क्र. १४८३

1483.
नेणे जप तप अनुष्ठान याग । काळे तव लाग घेतलासे ॥१॥
रिघालो या भेणे देवाचे पाठीसी । लागे त्याचे त्यासी सांभाळणे ॥धृपद॥
मापे माप सळे चालिली चढती । जाली मग राती काय चाले ॥२॥
तुका म्हणे चोरा हाती जे वाचले । लाभावरी आले वारिलेशु ॥३॥

अर्थ :
मी जप, तप, अनुष्ठान वगैरे काहीच जाणत नाही आणि काळाने तर माझा पाठलाग केला आहे. या भीतीनेच तर मी देवाच्या पाठीमागे लागलो आहे. आता त्याने माझा सांभाळ करून त्याच्या ब्रिदाचाही सांभाळ करावा व काळ आयुष्याचे माप मोजत आहे. एकदा की हा मनुष्य देह गेला, रात्र झाली मग तेथे कोणाचे काय चालणार आहे ? तुकाराम महाराज म्हणतात काळ रुपी चोराच्या हातून आत्तापर्यंत जे कोणी वाचले आहेत त्यांनी उरलेले आयुष्य हा मोठा लाभच आहे असे समजावे, मनुष्य देह आयुष्याचा लेष व अनेक दुःखाचे निवारण करू शकते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग