आधींच मी लटिका वरी ल
1469.
आधींच मी लटिका वरी लटिकी तुझी माया | ऐसे हे कासया पाहसी देवा ॥१॥
जाणता नेणता नाम तुझे देवा | गाईन केशवा आवडीने ॥२॥
विषयी आसक्त भ्रांत माझे मन कैसे तुझे भजन घडेल मज ॥३॥
नामा म्हणे आता जाणसी ते करी | पतितपावन हरि नाम तुझे ॥४॥
