भाग्य माझे उभे ठेले
1474.
भाग्य माझे उभे ठेले ।
संती दाविले निधान ॥१॥
आता उणे कोठे काही ।
न पडे ठायी भरलेंसे ॥२॥
जेथे पाहे तेथे आहे ।
न पाहतांही राहे कवळुनी ॥३॥
निळा म्हणे व्यापुनी अंतरी ।
गगनाही बाहेरी तेचि दिसे ॥४॥
1474.
भाग्य माझे उभे ठेले ।
संती दाविले निधान ॥१॥
आता उणे कोठे काही ।
न पडे ठायी भरलेंसे ॥२॥
जेथे पाहे तेथे आहे ।
न पाहतांही राहे कवळुनी ॥३॥
निळा म्हणे व्यापुनी अंतरी ।
गगनाही बाहेरी तेचि दिसे ॥४॥