संताचा महिमा देवचि ज
1491.
संताचा महिमा देवचि जाणे । देवाची गोडी संतांची पुसणे ॥१॥
ऐसी आवडी एकमेका । परस्परें नोहे सुटिका ॥२॥
बहुत रंग उदक एक । यापरी देव संत दोन्ही देख ॥३॥
संताविण देवा न कंठे घडी । उभयतां गोडी एक असे ॥४॥
मागे पुढे नहो कोणी । शरण एका जनार्दनी ॥५॥
