नापिकाचे परि वरी वरी
1471.
नापिकाचे परि वरी वरी बोडी | परि अंतरींची वाढी उणी नव्हे ॥१॥
तसे माझे मन न राहे समूळी | प्रपंच कवळी दाही दिशा ॥२॥
भक्ति प्रेमभाव वरी वरी दावी | अंतरी आटवी घराचार ॥३॥
मी लटिका जाण असे परोपरी | तारी भवसागरी म्हणे नामा ॥४॥