नित्य नवा कीर्तनी कै
1477.
नित्य नवा कीर्तनी कैसा वोढवला रंग । श्रोता आणि वक्ता स्वये जाला श्रीरंग ॥१॥
आल्हादे वैष्णव करती नामाचा घोष । हरिनाम गर्जता गगनी न माये हरुष ॥२॥
पदोपदी कीर्तनी निवताहे जन मन । आवडी भुकेली तिने गिळिले गगन ॥३॥
एका जनार्दनी गाता हरीचें नाम । निमाली इंद्रियें विषय विसरली काम ॥४॥
संतमहिमा
