धांउनिया मिठी घालीन
1484.
धांउनिया मिठी घालीन संतचरणी | सांगे वचनींचे गुज तुम्हा ॥१॥
विठोबाच्या गांवा यारे मनी येकवेळा | फार आहाळला जीव माझा ॥२॥
आनंदाचे जीवन पाहिन श्रीमुख | शोकमोहदुःख हरती माझे ॥३॥
विटेसहित चरण देईन कालिंगन | तेणे माझी तनु वोल्हावेल ॥४॥
तुम्ही माझे आवडते अंतरंग | माझे जिवलग प्राणसखे ॥५॥
नामा म्हणे विठो कृपेची माउली | तेव्हा ते साउली करिल मज ॥६॥
