वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ३. सार्थ अभंग १००१ ते १५००

साधावा तो देव सर्वस्

🙏 3. संत तुकाराम · ABH-079163 · अभंग क्र. १४७७

1477.
साधावा तो देव सर्वस्वाचेसाठी । प्रारब्ध तुटी क्रियमाण ॥१॥
मग कासयाने पुन्हा संवसार । बीजाचे अंकुर दग्ध होती ॥धृपद॥
जिणे दिल्हे त्यासी द्यावा पिंडदान । उत्तीर्ण चरण धरूनि व्हावे ॥२॥
तुका म्हणे निज भोगईल निजता । नाही होईल सत्ता दुजियाची ॥३॥

अर्थ :
देवाला सर्वच अर्पण करावे त्यामुळे आपले सर्व संचित, प्रारब्ध, क्रियमाण नाहीसे होतात जर प्रारब्ध, संचित, क्रियामाणच नष्ट झाले तर पुन्हा जन्म मरण राहील कोठे कारण कर्मरुपी बीजाचे अंकुर ज्ञानाच्या अग्नीने जळून जातात. ज्या हरीने आपल्याला हा देह दिला शेवटी हा देह त्यालाच अर्पण करून त्याच्या ऋणातून मुक्त व्हावे. तुकाराम महाराज म्हणतात जर आपण नीजस्वरूपाच्या ठिकाणीच प्रवेश केला तर आपल्याला भोग ही नीचजस्वरूपाचाच घडेल मग तेथे कोणत्याही अनात्म वस्तूची सत्ता आपल्यावर चालणार नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग