मंत्रयंत्र दीक्षा सा
1488.
मंत्रयंत्र दीक्षा सांगतील लक्ष | परि राम प्रत्यक्ष न करी कोण्ही ॥१॥
प्रत्यक्ष दावील राम धरीन त्याचे पाय | आणिकांची काय चाड मज ॥२॥
सर्व कामी राम भेटविती माते | जीवेंभावे त्यांते ओवाळीन ॥३॥
नामा म्हणे आम्हा थोर लाभ जाला | सोईरा भेटला अंतरींचा ॥४॥
