उद्धव बोले कृष्णाप्र
1481.
उद्धव बोले कृष्णाप्रती । ऐकोनि संतांचीं कीर्ति । धन्य वैष्णव होती । कलीमाजी ॥१॥
तुम्हा जयाचा निजछंद । मानीतसा परमानंद । अखंड तयाचा वेध । तुमचे मनी ॥२॥
ऐशी याची संगती । मज घडो अहोराती । नये पुनरावृत्ती । पुनः जन्मासी ॥३॥
हर्ष देव सांगे आपण । उद्धवा तयाचे मज ध्यान । एका जनार्दनी शरण । ते मज आवडती ॥४॥
