संतापोटीं देव वसे ।
1487.
संतापोटीं देव वसे । देवा पोटी संत असे ॥१॥
ऐसा परस्परे मेळा । देव संतांचा अंकिला ॥२॥
संतांठायीं देव तिष्ठे । देव तेथे संत वसे ॥३॥
एका जनार्दनी संत । देव तयांचा अंकित ॥४॥