घालुनि आसन साधिला पव
1481.
घालुनि आसन साधिला पवन | घेतले जीवन अंतरिक्षी ॥१॥
परहस्ते तृप्ति नव्हे जी दातारा | कृपा करुणा करा केशिराजा ॥२॥
जीवाचे जीवन तू सर्वाचे कारण | धांव मजलागुन केशिराजा ॥३॥
अनाथाचा नाथ है ब्रीद साचार | झणे माझा अव्हेर करिसी देवा ॥४॥
विष्णुदास नामा अंकियेला तुझा | विनवी केशिराजा प्रेमसुखे ॥५॥
